उजनी धरण 93.87% भरले; भीमा नदीत 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
सोलापूर, 27 जुलै (हिं.स.)। : उजनी धरण 93.87 टक्के भरल्याने आणि पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवार सकाळी 11 वाजल्यापासून भीमा नदीपात्रात एकूण 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सु
ujani


सोलापूर, 27 जुलै (हिं.स.)।

: उजनी धरण 93.87 टक्के भरल्याने आणि पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवार सकाळी 11 वाजल्यापासून भीमा नदीपात्रात एकूण 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरण व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांडव्यावरील वक्रद्वारांद्वारे 5,000 क्युसेक तर विद्युतगृहामधून 1,600 क्युसेक असा एकूण 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास आवश्यकतेनुसार या विसर्गात आणखी वाढ करण्यात येऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात कोणत्याही कारणाने उतरू नये तसेच नदीपात्रातील जनावरे, शेतीची साधने व इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता इंजि. सु. उ. डुंबरे यांनी केले आहे.

सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असेही धरण व्यवस्थापन विभागाने आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande