
* आर्थिक वर्ष २०२८-२९ पर्यंत ₹१००० कोटी उत्पन्नाचे लक्ष्य
मुंबई, २८ जुलै (हिं.स.) : सोलरयानने ‘सोलरयान २.०’चे अनावरण करत आपल्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या कंपनीने सोलर इन्व्हर्टर-केंद्रित कंपनीपासून सर्वसमावेशक ऊर्जा उपाययोजना पुरवणाऱ्या कंपनीकडे वाटचाल केली आहे. हे करत असतानाच देशभरातील वाढते जाळे, आर्थिक वर्ष २०२८-२९ पर्यंत ₹१००० कोटी उत्पन्नाचे लक्ष्य आणि १५हून अधिक राज्यांमध्ये विस्ताराची योजना याच्या बळावर कंपनीने हायब्रिड ऊर्जा उपाययोजना, बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आणि एकात्मिक ऊर्जा तंत्रज्ञानावर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्याच्या उद्देशाने हा विस्तार करण्यात येत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात देशभरात ५ लाखांहून अधिक सौर प्रकल्पांना ऊर्जा पुरवण्याचा टप्पा गाठल्यानंतर कंपनीने ही घोषणा केली आहे. गुजरातमध्ये मजबूत अस्तित्व आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये वाढता विस्तार असलेल्या सोलरयानने आता आपल्या पुढील विकास टप्प्यात प्रवेश केला आहे. या टप्प्यात बाजारपेठेचा विस्तार, पार्टनर नेटवर्क अधिक मजबूत करणे आणि भविष्यातील गरजांनुसार ऊर्जा उपाययोजना विकसित करणे यावर कंपनीतर्फे भर देण्यात येईल.
भारताची ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल होत असताना स्वतःची वीज निर्माण करणे, तिचा साठा करणे आणि तिचे व्यवस्थापन करणे शक्य होईल, अशा एकात्मिक उपाययोजनांची मागणी ग्राहकांकडून वाढत आहे. या बदलत्या गरजेला प्रतिसाद देत सोलरयानतर्फे सोलर इन्व्हर्टरपुरते मर्यादित न राहता व्यापक स्वच्छ ऊर्जा इकोसिस्टीम उभारण्याच्या दिशेने वाटचाल करण्यात येत आहे.
सोलरयान २.० अंतर्गत कंपनी ग्रिड-टायड इन्व्हर्टर्स (जीटीआय), हायब्रिड ऊर्जा उपाययोजना आणि बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (बीईएसएस) या तीन धोरणात्मक व्यवसाय स्तंभांवर भर देणार आहे. विश्वासार्ह वीजपुरवठा, ऊर्जा साठवण, स्वतःच्या वापरासाठी वीज निर्मिती आणि स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापन यांसाठी वाढणारी मागणी लक्षात घेऊन या व्यवसाय क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कंपनीच्या पुढील विकास टप्प्याविषयी बोलताना सोलरयानचे संस्थापक आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज पटेल म्हणाले, “गेल्या सहा वर्षांत सोलरयानने विश्वासार्ह सोलर इन्व्हर्टर उपाययोजनांच्या बळावर भक्कम पाया उभारला आहे. भारताची ऊर्जा व्यवस्था वेगाने बदलत असताना हायब्रिड ऊर्जा आणि ऊर्जा साठवण तंत्रज्ञानामध्ये मोठ्या संधी आम्हाला दिसत आहेत. सोलरयान २.० हे घरे, व्यावसायिक आस्थापने आणि उद्योगांसाठी सर्वसमावेशक ऊर्जा उपाययोजना भागीदार बनण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. त्याचबरोबर भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या प्रवासात अर्थपूर्ण योगदान देण्याचाही आमचा प्रयत्न आहे.
विकासाच्या पुढील टप्प्यात आम्ही विस्तार, नावीन्य आणि बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्यावर विशेष भर देणार आहोत. आर्थिक वर्ष २०२८-२९ पर्यंत ₹१००० कोटी उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्याबरोबरच १५हून अधिक राज्यांमध्ये आमची उपस्थिती अधिक मजबूत करणे आणि आमचे ईपीसी पार्टनर नेटवर्क दुप्पट करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”
सध्या कंपनी गुजरातमध्ये २०००हून अधिक ईपीसी पार्टनर्ससोबत कार्यरत असून, सौर ऊर्जा क्षेत्रात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आपले वितरण जाळे आणि सेवा इकोसिस्टीम अधिक मजबूत करण्याची योजना आखली आहे. दीर्घकालीन विकासाला चालना देण्यासाठी कंपनी उत्पादनांमधील नावीन्य, ग्राहक सहाय्य सुविधा आणि पुढील पिढीच्या ऊर्जा तंत्रज्ञानामध्येही गुंतवणूक करत आहे.
या नव्या टप्प्यासोबत कंपनीने आपल्या नव्या कॉर्पोरेट ओळखीचेही अनावरण केले आहे. कंपनीची व्यापक दृष्टी आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करणारी ही नवी ओळख आहे. सूर्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या नव्या लोगोमध्ये ‘सोलरयान’ या नावातील नऊ अक्षरांचे प्रतिनिधित्व करणारे नऊ आरे असून ते ऊर्जा, प्रगती, गतिशीलता आणि विकास यांचे प्रतीक आहेत. कंपनीच्या पूर्वीच्या लोगोमधील रॉकेटचा घटकही कायम ठेवण्यात आला असून, त्याद्वारे कंपनीच्या उद्योजकीय प्रवासाची आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाची आठवण जपण्यात आली आहे.
कंपनीच्या पुढील वाटचालीविषयी बोलताना सोलरयानचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय सहसंचालक शालिन बोटाड्रा म्हणाले, “भारताच्या वाढत्या अक्षय ऊर्जा बाजारपेठेला प्रतिसाद देत विस्तार साधत ग्राहक, पार्टनर्स आणि इतर संबंधित घटकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणजे सोलरयान २.० होय. देशभरात विस्तार करत असताना नावीन्य, गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवांच्या बळावर भविष्यासाठी सज्ज अशी संस्था उभारण्यावर आमचा भर कायम राहील.”
सोलरयानचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग पटेल म्हणाले, “सोलरयान २.०च्या केंद्रस्थानी ‘मनशा’ (मनशा – उद्देश) ही आमची मूल्यव्यवस्था आहे. संस्थापक मनोज पटेल आणि शालीन बोटाड्रा यांच्या नावांपासून प्रेरित असलेली ही संकल्पना मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स, गुणवत्तेची हमी (ॲश्युअरन्स ऑफ क्वालिटी), राष्ट्रनिर्माण (नेशन बिल्डिंग), उत्कृष्ट सेवा (सर्व्हिस एक्सलन्स), नम्रता (ह्युमिलिटी) आणि उत्तरदायित्व (अकाउंटेबिलिटी) या मूल्यांवर आधारित आहे. ही मूल्ये आमची कार्यसंस्कृती, निर्णयप्रक्रिया आणि दीर्घकालीन विकासाला दिशा देतात. भारताचे स्वच्छ ऊर्जा भविष्य हे सौर ऊर्जा, ऊर्जा साठवण आणि स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापन यांची सांगड घालणाऱ्या एकात्मिक ऊर्जा इकोसिस्टीममध्ये आहे, असा आमचा विश्वास आहे. ग्राहकांना अधिक ऊर्जा स्वावलंबन, विश्वासार्हता आणि शाश्वतता प्रदान करणाऱ्या भविष्यासाठी सज्ज उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी सोलरयान कटिबद्ध आहे.”
अधिक सक्षम उत्पादन पोर्टफोलिओ, देशभरातील वाढते अस्तित्व आणि भविष्योन्मुख धोरणाच्या बळावर सोलरयानतर्फे निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्वच्छ ऊर्जा उपाययोजनांचा स्वीकार अधिक वेगाने वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात येत आहे. तसेच भारताच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टांना गती देण्यासाठीही सोलरयान प्रयत्नशील आहे.
सोलरयानविषयी
२०१९ मध्ये स्थापन झालेली सोलरयान ही स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असून, सोलर इन्व्हर्टर्स, हायब्रिड ऊर्जा उपाययोजना, बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (बीईएसएस), ईव्ही चार्जर्स आणि ऊर्जा व्यवस्थापन उपाययोजना उपलब्ध करून देते. देशभरातील ५ लाखांहून अधिक सौर प्रकल्पांना ऊर्जा पुरवल्यानंतर कंपनी आता नावीन्य, गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवांच्या बळावर भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी कार्यरत आहे. ‘स्वच्छ ऊर्जेद्वारे अब्जावधी लोकांचे जीवन सक्षम करणे’ या ध्येयाने प्रेरित होऊन सोलरयान आपली वाटचाल करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी