स्विगी इन्स्टामार्टचे सीईओ अमितेश कुमार झा यांचा राजीनामा
नवी दिल्ली, 28 जुलै (हिं.स.)। आघाडीची ऑनलाइन फूड आणि इन्स्टंट कॉमर्स कंपनी असलेल्या स्विगीच्या इन्स्टामार्ट प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात एक मोठा बदल झाला आहे. इन्स्टामार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमितेश कुमार झा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल
Swiggy Instamart CEO Amitesh Kumar Jha has resigne


नवी दिल्ली, 28 जुलै (हिं.स.)। आघाडीची ऑनलाइन फूड आणि इन्स्टंट कॉमर्स कंपनी असलेल्या स्विगीच्या इन्स्टामार्ट प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात एक मोठा बदल झाला आहे. इन्स्टामार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमितेश कुमार झा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता मिंत्राच्या माजी सीईओ नंदिता सिन्हा कंपनीचा पदभार स्वीकारतील.

कंपनीने मंगळवारी शेअर बाजारांना कळवले की, स्विगीच्या मालकीच्या इन्स्टंट कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमितेश कुमार झा यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने दाखल केलेल्या माहितीनुसार, नंदिता सिन्हा ३ ऑगस्ट २०२६ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा कार्यभार स्वीकारतील. यापूर्वी सिन्हा मिंत्राच्या सीईओ होत्या.

कंपनीच्या माहितीनुसार, झा यांनी स्विगीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (समूह) श्रीहर्ष माजेटी यांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, मी संस्थेबाहेर इतर संधी शोधण्यासाठी इन्स्टामार्टच्या सीईओ पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना सिन्हा म्हणाल्या, इन्स्टामार्ट भारतातील दैनंदिन खरेदीच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या विकासाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी माझे सहकारी, भागीदार आणि ग्राहकांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande