श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर, सारांश जैन संघात नवा चेहरा
नवी दिल्ली, 28 जुलै (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. शुभमन गिलला पुन्हा एकदा संघाच
रवींद्र जडेजा


नवी दिल्ली, 28 जुलै (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. शुभमन गिलला पुन्हा एकदा संघाचा कर्णधार म्हणून, तर अनुभवी फलंदाज केएल राहुलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या संघातील सर्वात आश्चर्यकारक निवड म्हणजे सारांश जैन. त्याला भारतीय कसोटी संघात पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूला पहिल्यांदाच वरिष्ठ संघात बोलावण्यात आले आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळतील. यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांचाही फलंदाजीच्या फळीत समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार हे अष्टपैलू संघात आहेत.

बीसीसीआयने स्पष्ट केले की, वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी निवडीकरिता अनुपलब्ध होता आणि त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार आहेत. पण बीसीसीआयने स्पष्ट केले की, साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह यांची उपलब्धता बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) कडून मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल.

भारताने शेवटची कसोटी अफगाणिस्तानविरुद्ध खेळली. त्या संघाच्या तुलनेत, नितीश रेड्डी, हर्ष दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर सध्याच्या संघात नाहीत. रवींद्र जडेजा आणि बुमराह कसोटी संघात परतले आहेत. पण, बुमराहचा सहभाग अजूनही अनिश्चित आहे. शिवाय, सारांश हा एक नवोदित क्रिकेटपटू आहे. जडेजा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बरसापारा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळला होता. तो बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करत आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande