रत्नागिरी : 'पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या समन्वयक पदी आनंद आंबेकर
रत्नागिरी, 30 जुलै (हिं.स.) ।महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नाट्य चळवळीतील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याच्या समन्वयकपदी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या
आनंद आंबेकर


रत्नागिरी, 30 जुलै (हिं.स.) ।महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नाट्य चळवळीतील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याच्या समन्वयकपदी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक मंडळातर्फे पुणे विद्यापीठ स्तरावर १९६३ पासून पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित केली जात आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता २०१० पासून ही स्पर्धा पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या केंद्रांवर घेतली जात आहे. या केंद्रांवरील पारितोषिक विजेत्या एकूण २० संघांची डिसेंबर महिन्यात पुण्यात राज्यस्तरीय महाअंतिम फेरी होते. यंदाच्या स्पर्धेसाठी रत्नागिरी केंद्राचे समन्वयक म्हणून डॉ. आनंद आंबेकर पाहणी करणार आहेत. ते गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २७ वर्षांपासून कार्यरत आहेत.

ही नियुक्ती महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस राजन ठाकूरदेसाई आणि खजिनदार सुहास नांगरे यांनी जाहीर केली आहे. या निवडीबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, कार्यकारी सदस्य डॉ. संजय केतकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच कलोपासकच्या कार्यकर्त्यांनी डॉ. आनंद आंबेकर यांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande