फुटबॉल विश्वचषक 2026: मेस्सी मॅजिक कायम, इजिप्तला ३-२ ने पराभूत करत अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत
अटलांटा (अमेरिका), 08 जुलै (हिं.स.) फुटबॉल विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाने इजिप्तविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत ३-२ असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. रोमहर्षक सामन्यात, अर्जेंटिनाने शेवटच्या क्षणी पुनरागमन करत सामना जिंकला.
लिओनेल मेस्सी


अटलांटा (अमेरिका), 08 जुलै (हिं.स.) फुटबॉल विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाने इजिप्तविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत ३-२ असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. रोमहर्षक सामन्यात, अर्जेंटिनाने शेवटच्या क्षणी पुनरागमन करत सामना जिंकला. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने जोरदार खेळ करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले. विजयानंतर मेस्सी भावूक झाला होता, त्याने आपल्या सहकारी फुटबॉलपटूंना मिठी मारली आणि मैदानावर त्याला अश्रू अनावर झाले.

१५ व्या मिनिटाला, यासर इब्राहिमने एक शानदार गोल करून इजिप्तला ०-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, पहिल्या हाफच्या २१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टीची संधी मिळाली, पण मेस्सीने ती चुकवली. इजिप्तचा गोलकीपर मुस्तफा शोबेरने एक अप्रतिम बचाव करत मेस्सीला निराश केले. हा एक असा क्षण होता ज्याने उत्साहाच्या सर्व सीमा ओलांडल्या. पहिल्या हाफमध्ये इजिप्तने अर्जेंटिनावर वर्चस्व गाजवले. यासर इब्राहिमने १५ व्या मिनिटाला एक शानदार गोल करून इजिप्तला १-० अशी आघाडी मिळवून दिली, ज्याचा संघाने पुरेपूर फायदा घेतला आणि मध्यंतरापर्यंत इजिप्तने ही १-० ची आघाडी कायम ठेवली.

दुसऱ्या हाफमध्ये इजिप्तच्या संघाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी केली आणि ६७ व्या मिनिटाला मुस्तफा झिकोने दुसरा गोल करून अर्जेंटिनाला सामन्यातून जवळजवळ बाहेर काढले. अर्जेंटिनाविरुद्ध २-० च्या आघाडीसह, इजिप्त इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर होता. अखेरीस, अर्जेंटिनाने पहिला गोल करून पुनरागमनाची आशा निर्माण केली. ७९ व्या मिनिटाला क्रिस्टियन रोमेरोने आणि ८३ व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने गोल करून अर्जेंटिनासाठी एक उल्लेखनीय पुनरागमन पूर्ण केले. त्यानंतर एन्झो फर्नांडिसने शेवटच्या मिनिटात हेडरद्वारे गोल करून इंज्युरी टाइममध्ये अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली आणि अखेरीस अर्जेंटिनाचा विजय निश्चित केला. अर्जेंटिनाने हा सामना ३-२ ने जिंकला. पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर, अर्जेंटिनाने शेवटच्या क्षणांमध्ये सलग तीन गोल करून एक चमत्कारिक कामगिरी करून दाखवली. हा एक असा सामना होता ज्याने चाहत्यांना भरपूर रोमांच दिला.

इजिप्तविरुद्धच्या सामन्यात लिओनेल मेस्सीने गोल करून इतिहास रचला. एकाच विश्वचषकात आठ गोल करणारा मेस्सी अर्जेंटिनाच्या इतिहासातील दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे. असे करून त्याने ग्विलेर्मो स्टॅबिलच्या विक्रमाची बरोबरी केली. ग्विलेर्मो स्टॅबिलने १९३० च्या विश्वचषकात आठ गोल केले होते. आता, मेस्सीनेही त्या विक्रमाची बरोबरी करण्यात यश मिळवले आहे. याव्यतिरिक्त, मेस्सी पाच विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करणारा सहावा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी जस्ट फॉन्टेन (फ्रान्स, १९५८), जारझिन्हो (ब्राझील, १९७०), गेर्ड मुलर (जर्मनी, १९७०), रिवाल्डो (ब्राझील, २००२) आणि जेम्स रॉड्रिग्ज (कोलंबिया, २०१४) यांनी ही कामगिरी केली आहे. दरम्यान लिओनेल मेस्सीने २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या दोन्ही पेनल्टी चुकवल्या आणि एकाच विश्वचषक स्पर्धेत (शूटआऊट वगळता) दोन पेनल्टी चुकवणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande