
अकोला, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांनी पो. स्टे. पातुर चे कलम ७४,७५, ३५१ (३) बीएनएस. सह कलम ८, १२ पोक्सो अक्ट मधील आरोपी संजय जेठमल खरडे वय ४२ वर्ष रा. चिखलगांव, ता. पातुर, जि. अकोला यांचे विरूध्द वरील प्रमाणे गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला कलम ७४ बीएनएस मध्ये ०२ वर्ष सक्त मंजुरी कारावासाची शिक्षा व २०००/ रूपये दंड व कलम ७५ बीएनएस. मध्ये ०१ वर्ष सक्त मंजुरीची शिक्षा व १०००/रूपये तसेच कलम १२ पोक्सो मध्ये ०१ वर्ष सक्त मंजुरी शिक्षा व २०००/रूपये दंडची शिक्षा सुनावण्यात आली आहे
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, यातील आरोपी संजय जेठमल अरडे वय ४२ वर्ष रा. चिखलगांव, ता. पातुर, जि. अकोला यांने पिडीता हि तिचे घराचे समोर अंगणात कपडे धुत असतांना आरोपी हा तेथे आला व पिडीतेला सोबत अश्लील संभाषन करून तिचा विनयभंग केला. पिडीतेने त्याला येथुन तु निघुन जा असे म्हटले असता आरोपीने पिडीतेचा हात पकडुन ओढत नेण्याचा प्रत्यत्न केला व सदर घटने बाबत कोणाला काही सांगीतले तर जिवे मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन पातुर येथे अपराध क. ६२/२०२५ कलम ७४,७५, ३५१ (३) बीएनएस सह कलम ८, १२ पोक्सो अक्ट अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला तपासा अंती तपास अधिकारी सपोनि, गजानन तडसे यांनी सदर गुन्हयाचा तपास करून न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकार तर्फे विशेष सरकारी वकिल श्याम खोटरे यांनी सरकारी पक्षाची बाजु भक्कम व प्रभावीपणे मांडली.
सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक अचिंत चांडक , अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी , उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापुर विभाग गजानन पडघन, पो.स्टे. पातुर पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोहेकॉ वासुदेव मात्रे पो.स्टे. पातुर, सफौ अनवर खान सिएमएस सेल अकोला यांनी पाठपुरावा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे