
अकोला, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। पोलीस अधिक्षक अर्चीत चांडक यांनी जिल्हयातील अवैध धंदे यांच्यावर अंकुश घालण्याकरीता ऑपरेशन प्रहार योजना राबवत असुन गोवंश तस्करी व वाहतुक करण्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश अकोला जिल्हयातील सर्व ठाणेदार यांना दिले होते. पोलीस अधिक्षक अर्चीत चांडक यांचे निर्देशानुसार पो स्टे बार्शीटाकळी येथे प्रभावी कोंबीग गस्त व पेट्रोलींग पो स्टे परीसरात राबविण्यात असताना सहा. फौ फराज शेख ब.न ८०४ यांना दिनांक ११/०८/२०२६ रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली की ४ गोवंश जातीचे जनावरे कत्तली करीता खोलेश्वर मंदीर ते हॅलोपुराकडे एक इसम हा ०४ जनावरे गोवश कत्तली करीता पायी घेवून येत आहे. अशी माहिती प्राप्त होताच सदर माहीती परी पो.उप. अधिक्षक आनंद कांदे साहेब यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही, पो. स्टॉफ व पंचासह मिळलेल्या माहिती प्रमाणे रात्री २३/३० वा दरम्याण घटनास्थळी जावुन दबा धरून बसलो असता काही वेळातच एक इसम ०४ गोवंश जातीचे जनावरे हकालत पायी येत असताना दिसला. तो इसम पंचाना दाखवुन सदर इसमास पोलीसांची चाहूल लागताच जनावरे सोडुन पळुन गेला. दोन पंचा समक्ष सदर जनावरांची पाहणी केली असता तिथे ४ गोवंश जातीचे जनावरे त्यामध्ये एक गाय व तिने गोरे असे सापडले. सदरचे गोवंश एकुण किं. अं. ८७,०००/रू किंमतीचे जप्त करुन पुढील देखरेखी करीता व संगोपणा करीता आदर्श गोसेवा संस्थान, म्हैसपुर येथे दाखल करण्यात आले. सदर अज्ञात इसमाविरुध्द पो.स्टे. ला प्राणी संरक्षण अधि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे