
रत्नागिरी, 15 ऑगस्ट (हिं.स.) । भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रत्नागिरीत जिल्हा पोलीस संचलन मैदानावर जिल्ह्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याच्या विकासाचा आलेख मांडला. ३० कोटींचे क्रीडा संकुल, अवकाळीग्रस्त आंबा, काजू बागायतदार
५२ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमा इत्यादी माहिती देतानाच जागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळ, पर्यटन, रोजगार आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांचा यात समावेश होता.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी संचलनाचे निरीक्षण केले. यानंतर परेड कमांडर परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली संचलनास प्रारंभ झाला. पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक १, परिवीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक २, परिवीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक ३, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सिद्धी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस महिला पथक, हवालदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बँड पथक, पलटन नाईक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा गृह रक्षक दल, पलटन नाईक मीनाक्षी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महिला गृह रक्षक दल, पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली ॲलेक्स श्वान पथक, जवाहर नवोदय विद्यालय स्टुडंट पोलीस कॅडेट, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांचा समावेश होता.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी पालकमंत्र्यांनी केला. त्यामध्ये प्रणय कांबळे, स्पृहा जोशी, आरोही केदारी, काव्या यादव, आरोही चव्हाण, शर्विल पाटील, शाश्वत ओकाटे, रुद्रा कदम, अद्वैत क्षीरसागर, सोहम मोहिते, प्रसाद जाधव, अमेय नांदिवडेकर, आराध्य देसाई यांचा समावेश होता. चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत राजवर्धन काळे, क्रिपाळ कांबळे, निर्मय पवार, भूमी भिंगार्डे, दक्ष निर्मळ, किरण शिंदे, अर्णव शिंदे, आयुष जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी