स्वातंत्र्यदिनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण
पुणे, 15 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधानभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला.ध्वजारोहणानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोक
grdf


पुणे, 15 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधानभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला.ध्वजारोहणानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार डॉ. निलमताई गोऱ्हे, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande