
पुणे, 15 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, तहसीलदार श्वेता पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु