सौदी अरेबियात भीक मागू नका, हज-उमराह यात्रेकरूंना पाकिस्तानचा कडक इशारा
इस्लामाबाद , 18 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानने सौदी अरेबियामध्ये हज आणि उमराहसाठी जाणाऱ्या आपल्या नागरिकांना कडक इशारा दिला आहे. भीक मागणे, परवानगीशिवाय पैसे गोळा करणे तसेच व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करणे टाळा, अन्यथा अटक, ताब्यात घेणे आणि देशातून हद्
सौदी अरेबियात भीक मागू नका, हज-उमराह यात्रेकरूंना पाकिस्तानचा कडक इशारा


इस्लामाबाद , 18 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानने सौदी अरेबियामध्ये हज आणि उमराहसाठी जाणाऱ्या आपल्या नागरिकांना कडक इशारा दिला आहे. भीक मागणे, परवानगीशिवाय पैसे गोळा करणे तसेच व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करणे टाळा, अन्यथा अटक, ताब्यात घेणे आणि देशातून हद्दपार करण्याची कारवाई होऊ शकते, असे सौदी अरेबियातील पाकिस्तानी दूतावासाने स्पष्ट केले आहे.

सौदी अरेबियातील पाकिस्तानी दूतावासाने उमराह यात्रेकरू आणि कामगारांसाठी महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. त्यामध्ये सौदी अरेबियातील कायदे आणि व्हिसाच्या अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास सौदी अधिकारी संबंधित व्यक्तीला अटक करू शकतात, तुरुंगात पाठवू शकतात किंवा देशातून परत पाठवू शकतात.

दूतावासाने सोशल मीडियावर एआय-निर्मित व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला सौदी अधिकाऱ्यांकडून अटक करून तुरुंगात नेले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व उमराह यात्रेकरू आणि कामगारांसाठी महत्त्वाचा संदेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दूतावासाच्या म्हणण्यानुसार, मक्का आणि मदिनामधील पवित्र स्थळांच्या परिसरात भीक मागणे आणि बेकायदेशीरपणे पैसे मागण्याबाबत सौदी अधिकाऱ्यांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे यात्रेकरूंनी बेकायदेशीर स्थानिक सेवांचा वापर करू नये आणि कोणतीही आर्थिक मदत केवळ कायदेशीर मार्गानेच घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

तसेच, व्हिसाच्या अटी आणि त्याची वैधता यांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही सौदी अरेबियात राहणे (ओव्हरस्टे) किंवा व्हिसाच्या श्रेणीबाहेरील कोणत्याही गतिविधीत सहभागी होणे टाळावे, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी एकूण १६,७३,३२० हज यात्रेकरू सौदी अरेबियात पोहोचले होते. त्यापैकी १५,०६,५७६ यात्रेकरू परदेशातून आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande