भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा दाखला देत ट्रम्प यांची अमेरिकेत मतदार ओळखपत्राची मागणी
वॉशिंग्टन , 18 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेचे उदाहरण देत अमेरिकेतील प्रत्येक मतदारासाठी फोटो ओळखपत्र अनिवार्य करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, भारताचे मुख्य न
भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा दाखला देत ट्रम्प यांची अमेरिकेत मतदार ओळखपत्राची मागणी


वॉशिंग्टन , 18 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेचे उदाहरण देत अमेरिकेतील प्रत्येक मतदारासाठी फोटो ओळखपत्र अनिवार्य करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्यांच्या प्रशासनाला असा सवाल केला होता की, अमेरिकेत वैध फोटो ओळखपत्राशिवाय निवडणुका कशा घेतल्या जातात? भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा दाखला देत ट्रम्प यांनी अमेरिकेतही मतदारांची ओळख आणि नागरिकत्वासंदर्भातील नियम अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला की, भारतातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ६४.६ कोटी लोकांनी मतदान केले आणि एक टक्क्यांपेक्षाही कमी मतदारांनी टपालाद्वारे मतदानाचा वापर केला. तसेच, प्रत्येक मतदारासाठी वैध फोटो ओळखपत्र आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले. अमेरिकेत फोटो ओळखपत्र अनिवार्य करण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेचे उदाहरण दिले. त्यांच्या मते, यामुळे निवडणुकीतील गैरप्रकारांची शक्यता कमी होऊ शकते.

ट्रम्प ज्या ‘सेव्ह अमेरिका अॅक्ट’ला पाठिंबा देत आहेत, त्याचे पूर्ण नाव ‘सेफगार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी अॅक्ट’ असे आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, अमेरिकेत मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या नागरिकत्वाचा पुरावा सादर करावा लागणार आहे. याशिवाय, देशभरात मतदार ओळखपत्राची व्यवस्था लागू करण्याचा प्रस्ताव आहे. टपालाद्वारे मतदानाच्या सुविधेवरही कठोर निर्बंध घालण्याची तरतूद या कायद्यात प्रस्तावित आहे.

निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी हे उपाय आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, ‘सेव्ह अमेरिका अॅक्ट’च्या मुद्द्यावर अमेरिकेत अद्याप राजकीय सहमती झालेली नाही. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांमध्येही या मुद्द्यावर मतभेद आहेत. ट्रम्प सातत्याने हा कायदा मंजूर करण्याची मागणी करत आहेत; मात्र, सिनेटमध्ये तो पुढे नेण्यासाठी अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

ऑगस्टच्या सुरुवातीला अमेरिकन सिनेट पाच आठवड्यांच्या सुट्टीवर गेली आणि या कायद्याबाबत कोणतीही अंतिम प्रगती झाली नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी भारताचा दाखला देणे ही त्यांची राजकीय मोहीम पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.मतदाराची ओळख आणि नागरिकत्वाची पडताळणी ही निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचा ट्रम्प यांचा युक्तिवाद आहे. भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा संदर्भ देत त्यांनी अमेरिकेतही अशाच प्रकारचे नियम लागू करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी अमेरिकेने ‘सेव्ह अमेरिका अॅक्ट’ मंजूर करावा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, या कायद्यावरून अमेरिकेतील राजकीय मतभेद अद्याप कायम आहेत.

भारताचे उदाहरण देत ट्रम्प यांनी अमेरिकेतील निवडणूक व्यवस्थेत मतदार ओळखपत्र आणि नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणला आहे.ट्रम्प यांच्या वक्तव्याला अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनीही समर्थन दिले आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अगदी बरोबर आहेत.” गोर यांनी दावा केला की, भारतातील मागील लोकसभा निवडणुकीत ६४.६ कोटी मतदार होते आणि प्रत्येक मतदारासाठी ओळखपत्र आवश्यक होते. याच उदाहरणाचा दाखला देत त्यांनी अमेरिकन काँग्रेसला ‘सेव्ह अमेरिका अॅक्ट’ मंजूर करण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande