अकोला : आरोपी पोलीसाची कसून चौकशी करा- अंजली आंबेडकर
अकोला, 19 ऑगस्ट (हिं.स.)। बाळापूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याने लैंगिक शोषण करुन त्या अल्पवयीन मुलीचा मृत्यु झाला. सदर पोलिसा
Photo


अकोला, 19 ऑगस्ट (हिं.स.)। बाळापूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याने लैंगिक शोषण करुन त्या अल्पवयीन मुलीचा मृत्यु झाला. सदर पोलिसाची

कसून चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केली. पिडीत कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही

मागणी केलीय.

बाळापूर शहरातील अल्पवयीन मुलगी स्व. गौरी ठाकरे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी गौरीच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अंजलीताईंनी गंभीर आरोप करत म्हटले की, आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याने गौरीवर लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर तिला फाशी देऊन मारण्यात आले. त्यामुळे या आरोपीची कसून चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी आमदार नातीकोद्दीन खतीब, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे, सरपंच सोनू उपर्वट, गुलाब उमाळे, बंटी किल्लेकर यांच्यासह वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande