सुनेत्रा पवारांबाबत पत्र काढून खोडसाळपणा करणे चुकीचे - भुजबळ
नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)। - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या बाबत जे पत्राचे खेळ चालू आहेत ते नक्की कोण करत आहे याबाबत आम्हाला कोणाला काहीही माहिती नाही पण सुनेत्रा पवार या आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष हवे आहेत
It is wrong to mischief by


नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या बाबत जे पत्राचे खेळ चालू आहेत ते नक्की कोण करत आहे याबाबत आम्हाला कोणाला काहीही माहिती नाही पण सुनेत्रा पवार या आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष हवे आहेत असे स्पष्ट मत राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की आमचा विरोध गिरीश महाजन यांना नाही त्यांना सर्व ते सहकार्य कुंभमेळ्यासाठी केले जाईल असेही स्पष्ट केले.

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ मंत्री, समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावरती आहेत गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की त्रंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी जो वेळ लागतो आहे तो चुकीचा आहे यावर काही ना काहीतरी मार्ग काढून लवकरात लवकर भाविकांचे दर्शन कसे होईल यासाठी मी स्वतः अधिकाऱ्यांशी चर्चा करेल आणि दर्शन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करेल असे सांगून त्रंबक मार्गावरती होणाऱ्या अपघातांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली यावेळी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा देखील बोलून दाखवली.

कुंभमेळा बाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की कुंभमेळा मंत्री म्हणून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होणे यात काहीच गैर नाही आणि आमचा विरोध हा गिरीश महाजन यांना नव्हता आणि नाही पण असे स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले की कुंभमेळ्यासाठी गिरीश महाजनांना जे काही सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य नक्की केले जाईल. असे स्पष्ट करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की मागील कुंभमेळ्याच्या वेळी देखील शेतकऱ्यांना पहिल्यांदा पैसे दिलेले होते त्यानंतर त्यांनी जमिनी दिल्या होत्या आताही त्यांना सर्वप्रथम पैसे द्यावे लागतील त्यानंतरच त्यातून मार्ग निघेल असेही ते म्हणाले.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत निघत असलेल्या पत्रांबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की हा खोडसाळपणा कोण करत आहे हे माहिती नाही पण असे करणे चुकीचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार खासदार व अन्य लोकप्रतिनिधींना सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्षा पाहिजे आहेत त्यामुळे अशा स्वरूपाचे खोडसाळपणा करणे चुकीचे आहे नक्की काय पत्र निघाला आहे हे मी वाचलेलं नाही ते मी मुंबईला गेल्यानंतर वाचेल असेही ते म्हणाले.

पार्थ पवार यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की शरद पवार हे पार्थ पवार यांचे आजोबा आहेत आणि ते स्वतःही खासदार आहेत शरद पवार देखील खासदार आहेत त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही असे स्पष्ट करून राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले की जसे सत्ताधारी आपली प्रतिमा उजळण्यासाठी प्रयत्न करतात तसेच विरोधकही प्रयत्न करत असतात तसाच राहुल गांधी यांचा प्रयत्न असेल असे वाटत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande