मनमाडला ईद मिलादुन्नबी निमित्ताने भव्य जुलूस, विविध उपक्रमांनी मोहम्मद पैगंबर जयंती साजरी
मनमाड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। जगाला शांती,सदभावना व बंधुभावचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद- ए-मिलादुन्नबी मनमाड शहरात आज (बुधवारी) पारंपरिक पद्धतीने अभूतपूर्व जल्लोषात साजरा करण्यात आला.या निमित्त
मनमाडला ईद मिलादुन्नबी निमित्ताने भव्य जुलूस, विविध उपक्रमांनी मोहम्मद पैगंबर जयंती साजरी


मनमाड, 26 ऑगस्ट (हिं.स.)।

जगाला शांती,सदभावना व बंधुभावचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद- ए-मिलादुन्नबी मनमाड शहरात आज (बुधवारी) पारंपरिक पद्धतीने अभूतपूर्व जल्लोषात साजरा करण्यात आला.या निमित्त शरबत,हलवा,पेढे,मिठाई वाटपा सोबत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून भव्य जुलुस काढण्यात आला होता त्यात हजारो मुस्लिम बांधवा सोबत इतर धर्मीय नागरिक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे पैगंबर जयंतीत राष्ट्रीय एकात्मता दिसून आली.शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने जुलूस तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरूचा सत्कार करण्यात आला.

ईद-ए-मिलाद निमित्त तरुणांनी एकात्मता चौकात आकर्षक देखावा उभारला होता.जामा मस्जिदचे मौलाना असलम रिजवी साहब यांच्यासह शहरातील इतर सर्व प्रमुख मौलानांच्या नेतृत्वाखाली सकाळी भव्य जुलूस काढण्यात आला.नारा-ए-तकबीर अल्लाह हु अकबर,हुजूर का दामन नही छोडेंगे यासह इतर घोषणा देत जुलूस पाकिजा कॉर्नर मार्गे नगीना मशीद उस्मानिया चौक, एकात्मता चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन गायकवाड चौक, 52 नंबर फुले पुतळा या मार्गे हुसेनी चौकातील जामा मशिदीजवळ विसर्जन करण्यात आले.जुलूस पालिकेच्या समोर येताच पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी जामा मशिदीचे मुख्य मौलाना अस्लम रिझवी यांचा व इतर मौलानाचा सत्कार केला.नगीना मशिद सह इतर अनेक ठिकाणी यावेळी मिठाई व मुस्लिम बांधवांना टोपी वाटप करण्यात आले. ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.गायकवाड चौकात माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी जुलूसचे स्वागत करून मौलानाचा सत्कार केला.उस्मानिया चौक येथे फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे अध्यक्ष अहमद मिरझा बेग व कार्याध्यक्ष फिरोज शेख यांच्या नेतृत्वाखाली सत्कार व स्वागत करण्यात आले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश धात्रक यांच्यातर्फे त्यांच्या कार्यलायाबाहेर मौलाना व इतर प्रमुख नागरिकांचा सत्कार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande