भाजपच्या परभणी ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीची घोषणा
परभणी, 27 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीमध्ये विविध पदाधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपच्या परभणी ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीची घोषणा


परभणी, 27 ऑगस्ट (हिं.स.)।

भारतीय जनता पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीमध्ये विविध पदाधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे. परभणी ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश भुमरे यांची, तर जिल्हा प्रभारीपदी संजय केनेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीस म्हणून पंडित दराडे, आकाश लोहट, भिमराव वायवळ, ऋषिकेश सकनूर आणि प्रसाद खारकर यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र व राज्यातील मंत्र्यांमधून कमाल तीन सदस्यांचा समावेश करण्याच्या तरतुदीनुसार मेघना बोर्डीकर यांची कमिटीमध्ये निवड करण्यात आली आहे. महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष या प्रवर्गातून लता वाकळे यांचा समावेश करण्यात आला आहे. माजी जिल्हाध्यक्ष (सलग्न) म्हणून संतोष मुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते या प्रवर्गात माजी खासदार, राष्ट्रीय पदाधिकारी, आमदार, प्रदेश पदाधिकारी यांच्यामधून कमाल तीन सदस्यांचा समावेश करण्यात येणार असून, या प्रवर्गात सुरेश वरपुडकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या ग्रामीण संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्यातील पक्ष संघटना, आगामी राजकीय कार्यक्रम आणि विविध संघटनात्मक विषयांवर या कमिटीच्या माध्यमातून समन्वय साधला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande