जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा छडा; आरोपींकडून जप्त केलेले लाखो रुपये थेट शेतकऱ्यांच्या हातात
लातूर, 28 ऑगस्ट (हिं.स.) जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली ८ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे
पोलीस कारवाई


लातूर, 28 ऑगस्ट (हिं.स.)

जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली ८ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या जनावर चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रेणापूर पोलीस ठाण्यात दाखल ७ गुन्ह्यांतील एकूण ८ लाख १५ हजार रुपयांची रक्कम संबंधित शेतकरी फिर्यादींना बंदपत्र घेऊन परत करण्यात आली.

परत करण्यात आलेली रक्कम पुढीलप्रमाणे :

गु.र.क्र. ४००/२०२६ – शिवाजी मारुती शिरसाट : १,२०,००० रुपये

गु.र.क्र. ३९/२०२६ – संतोष तुकाराम जोगदंड : १,००,००० रुपये

गु.र.क्र. ५५/२०२६ – शेख फारूक सरदार : १,६०,००० रुपये

गु.र.क्र. १७०/२०२६ – धोंडीराम दत्तू भिसे : १,२०,००० रुपये

गु.र.क्र. १८९/२०२६ – हरिराम शंकरराव बाणापुरे : १,७०,००० रुपये

गु.र.क्र. २०९/२०२६ – शालिवाहन लक्ष्मण राऊतराव : ६५,००० रुपये

गु.र.क्र. ३९६/२०२६ – रामगोविंद गुंडले : ८०,००० रुपये

दरम्यान, गु.र.क्र. १७३/२०२६ मधील फिर्यादी वैयक्तिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यातील २ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यात आली आहे. संबंधित फिर्यादी पोलीस ठाण्यात उपस्थित झाल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम त्यांना परत करण्यात येणार आहे.

जनावर चोरीसारख्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद करण्यासोबतच, आरोपींकडून हस्तगत झालेली रक्कम व मालमत्ता संबंधित शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून जनावर चोरीसह मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande