निवडणूक आयोगाची बनावट लिंक पाठवून वृद्धाला साडेसहा लाखांचा गंडा
नाशिक, 28 ऑगस्ट (हिं.स.)। :- भारतीय निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट लिंक पाठवून अज्ञात भामट्याने एका सेवानिवृत्त वृद्धास ६ लाख ५६ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अरुणकु
निवडणूक आयोगाची बनावट लिंक पाठवून वृद्धाला साडेसहा लाखांचा गंडा


नाशिक, 28 ऑगस्ट (हिं.स.)।

:- भारतीय निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट लिंक पाठवून अज्ञात भामट्याने एका सेवानिवृत्त वृद्धास ६ लाख ५६ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अरुणकुमार रामेश्वरप्रसाद जयस्वाल (रा. अश्विननगर, सिडको) हे दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरी होते. त्यावेळी अज्ञात इसमाने

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीच्या मोबाईल फोनवर भारतीय निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट लिंक पाठविली. त्या लिंकद्वारे फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून फिर्यादीकडून ६ लाख ५६ हजार १४ रुपये इतकी रक्कम हस्तांतरित करून घेतली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागूल करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande