‘अँथे’ ठरते राष्ट्रीय प्रतिभा मूल्यांकनाचा प्रभावी मंच
गेल्या 16 वर्षांत 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी नागपूर, 27 ऑगस्ट (हिं.स.) : विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षमतेचे मूल्यमापन करण्याबरोबरच बलस्थाने, सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे आणि भविष्यातील तयारीची दिशा समजून घेण्यास मदत करणारी
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आकाशची चमू


गेल्या 16 वर्षांत 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

नागपूर, 27 ऑगस्ट (हिं.स.) : विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षमतेचे मूल्यमापन करण्याबरोबरच बलस्थाने, सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे आणि भविष्यातील तयारीची दिशा समजून घेण्यास मदत करणारी आकाश राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा (ANTHE) यंदाही आयोजित करण्यात येत आहे. गेल्या 16 वर्षांत या परीक्षेसाठी 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ती भारतातील दीर्घकाळ चालणाऱ्या आणि मोठ्या विद्यार्थी मूल्यांकन मंचांपैकी एक ठरली आहे.

अँथे ही केवळ गुणांवर आधारित परीक्षा नसून शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले निदानात्मक मूल्यांकन आहे. परीक्षेतील प्रत्येक प्रश्न विशिष्ट संकल्पना आणि क्षमतेचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने तयार केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे विषयज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता, स्पर्धात्मक तयारी तसेच परीक्षा देतानाचे वर्तन यांचे व्यापक मूल्यमापन करता येते. अँथेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मूल्यांकनाचा फायदा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीतही दिसून येतो. नीट-यूजी 2026 मध्ये आकाशच्या टॉप 100 मधील 41 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी यापूर्वी अँथेच्या माध्यमातून पात्र ठरले होते. तसेच जेईई-ऍडव्हान्स 2026 मधील टॉप 100 मध्ये स्थान मिळवलेल्या आकाशच्या 11 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी अँथेचे माजी पात्र विद्यार्थी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

अँथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर ‘अँथे इंटेलिजन्स रिपोर्ट’ उपलब्ध करून दिला जातो. या अहवालातून विषयनिहाय बलस्थाने आणि सुधारणा आवश्यक असलेल्या बाबी समजण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्याची स्पर्धात्मक परीक्षा यश क्षमता (सीईएसपी), परीक्षा देणारे व्यक्तिमत्त्व (टीटीपी) आणि प्रयत्न बुद्ध्यांक (एआयक्यू) यांसारख्या घटकांचेही विश्लेषण केले जाते. त्यामुळे विद्यार्थी प्रश्न सोडवताना अचूकता, प्रयत्न आणि जोखीम यांचा कसा समतोल साधतो, याचीही माहिती मिळते.राष्ट्रीय बेंचमार्किंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्य तसेच देशपातळीवरील समवयस्कांच्या तुलनेत आपली स्थिती समजून घेता येते. त्यामुळे केवळ जेईई किंवा नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुरते अँथेचे महत्त्व मर्यादित न राहता, शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील विद्यार्थ्यांनाही त्याचा उपयोग होऊ शकतो.

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र शेखर गरिसा रेड्डी म्हणाले की, अँथे ही केवळ विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती मोजणारी परीक्षा नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता, बलस्थाने आणि सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे समजून घेण्यास मदत करणे हा तिचा व्यापक उद्देश आहे. गेल्या 16 वर्षांत एक कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी अँथेवर विश्वास ठेवला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने या परीक्षेतून आपल्या शैक्षणिक प्रवासाबाबत अधिक स्पष्टता आणि भविष्यासाठी माहितीपूर्ण दिशा घेऊन बाहेर पडावे, हा आमचा प्रयत्न आहे.

अँथे 2026 मध्ये पात्र विद्यार्थ्यांना निकषांनुसार 100 टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2.5 कोटी रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असून परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी घेण्यात येणार आहे. अँथे 2026 साठी नोंदणी अधिकृत अँथे पोर्टल तसेच देशभरातील आकाश केंद्रांवर सुरू झाली आहे. ऑनलाइन परीक्षा 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत, तर ऑफलाइन परीक्षा 11 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande