एथर एनर्जीने कोणार्क इलेक्ट्रिक स्कूटर केली लाँच
मुंबई, 29 ऑगस्ट (हिं.स.)। एथर एनर्जीने बहुचर्चित एथर कोणार्क इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. एथरच्या ईएल प्लॅटफॉर्मवर आधारित असलेली ही कंपनीची पहिली मेटल बॉडी असलेली स्कूटर आहे. आकर्षक डिझाइनसोबतच कंपनीने कोणार्कमध्ये अनेक स्मार्ट आ
Ather Energy Launches Konark Electric Scooter


मुंबई, 29 ऑगस्ट (हिं.स.)। एथर एनर्जीने बहुचर्चित एथर कोणार्क इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. एथरच्या ईएल प्लॅटफॉर्मवर आधारित असलेली ही कंपनीची पहिली मेटल बॉडी असलेली स्कूटर आहे. आकर्षक डिझाइनसोबतच कंपनीने कोणार्कमध्ये अनेक स्मार्ट आणि आधुनिक फिचर्स दिले आहेत. ही स्कूटर स्मार्ट की आणि कनेक्टेड तंत्रज्ञानासह उपलब्ध करण्यात आली असून, ग्राहकांना एस-लाईन आणि झी-लाईन असे पर्याय मिळणार आहेत.

एथर कोणार्क एस-लाईनच्या १०० किलोमीटर रेंज असलेल्या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ९९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. १२५ किलोमीटर रेंजच्या व्हेरिएंटची किंमत १ लाख २१ हजार ९९९ रुपये, तर १६१ किलोमीटर रेंज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत १ लाख ४४ हजार ९९९ रुपये आहे. एस-लाईनमध्ये एकूण चार व्हेरिएंट उपलब्ध असतील. यातील १२५ आणि १६१ किलोमीटर रेंजच्या मॉडेल्सची डिलिव्हरी सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. १०० किलोमीटर रेंजच्या बेस व्हेरिएंटची डिलिव्हरी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. २०० किलोमीटर रेंज असलेले मॉडेलही पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बाजारात येणार आहे. झी-लाईनची डिलिव्हरी २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची शक्यता आहे.

कोणार्कमध्ये २.१ किलोवॅट-तास, २.७ किलोवॅट-तास आणि ३.५ किलोवॅट-तास क्षमतेच्या बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहेत. एस-लाईनची टॉप स्पीड ७० किलोमीटर प्रतितास असून, झी-लाईनची टॉप स्पीड ८० किलोमीटर प्रतितास आहे. झी-लाईनमध्ये आयडीसीनुसार १६१ किलोमीटरपर्यंत रेंज मिळते. फिचर्सच्या बाबतीतही कोणार्कमध्ये मोठी यादी पाहायला मिळते. यात ऑटो-होल्ड, फॉल सेफ, एअरवॉक, ब्लूटूथ कॉलिंग, म्युझिक अलर्ट, थेफ्ट आणि टो अलर्ट, फाइंड माय स्कूटर आणि ओटीए अपडेट्स मिळतात. स्कूटरमध्ये ३१ लिटरची अंडरसीट स्टोरेज जागा आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, व्हॉइस कंट्रोल, फुल-फ्लेज्ड नेव्हिगेशन, पॉटहोल अलर्ट, क्रॅश अलर्ट, कीलेस इग्निशन, कीलेस बूट रिलीज आणि हिल-होल्ड असिस्ट यांसारख्या सुविधा कोणार्कला अधिक आधुनिक बनवतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande