रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार अरुण आठल्ये यांचे निधन
रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । खानू (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये (वय ७८) यांचे आज शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा परिवार आहे. १९
अरुण आठल्ये


रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । खानू (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये (वय ७८) यांचे आज शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा परिवार आहे.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांचा सहभाग होता. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर अरुण आठल्ये यांनी मर्चंट नेव्हीमध्ये काही काळ सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी खानूचे सरपंचपदही भूषवले. त्याच बरोबर विविध वृत्तपत्रांत त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी अनेक समस्यांना वाचा फोडली.कै. आठल्ये यांच्या पार्थीवावर खानूमध्ये उद्या, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande