नेपाळ: भोटेकोशी-त्रिशुली पुरानंतर सुमारे ५,००० लोकांचा संपर्क तुटल्याची शक्यता
काठमांडू, २९ ऑगस्ट (हिं.स.) नेपाळमधील भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या विनाशकारी पुराचा तिसरा दिवस उजाडला असला तरी, या आपत्तीमुळे किती लोक बाधित झाले आहेत आणि किती जण बेपत्ता आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, सरकारच्या प्राथमिक तांत्
नेपाळमधील पुरात २८८ भारतीय अजूनही बेपत्ता


काठमांडू, २९ ऑगस्ट (हिं.स.) नेपाळमधील भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या विनाशकारी पुराचा तिसरा दिवस उजाडला असला तरी, या आपत्तीमुळे किती लोक बाधित झाले आहेत आणि किती जण बेपत्ता आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, सरकारच्या प्राथमिक तांत्रिक मूल्यांकनानुसार, पुरानंतर सुमारे ५,००० लोक संपर्काबाहेर असल्याची माहिती आहे.

गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रसुवामधील गोसाईकुंड ते नुवाकोटमधील देवीघाट परिसरापर्यंत, पुरापूर्वी सुमारे ५,००० मोबाईल वापरकर्ते सक्रिय होते, पण पुरानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. हे प्राथमिक मूल्यांकन नेपाळच्या दोन प्रमुख दूरसंचार कंपन्या, नेपाळ टेलिकॉम आणि एनसेल यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर आधारित होते.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत १,९२४ लोक संपर्काबाहेर गेल्याचे वृत्त आहे. यापैकी ९३३ जण जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत.

पूर आणि भूस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या परदेशी नागरिकांची संख्या सुमारे ५१७ असल्याचे वृत्त आहे. तथापि, या आकडेवारीबाबतची परिस्थितीही अस्पष्ट आहे. शुक्रवार संध्याकाळपर्यंत, नेपाळ सरकारला बेपत्ता किंवा अज्ञात व्यक्तींबाबत सुमारे २,००० अर्ज प्राप्त झाले होते.

बेपत्ता व्यक्तींमध्ये रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील स्थानिक रहिवासी, तसेच गोसाईकुंडाला भेट देणाऱ्या पर्यटकांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते, बाधित भागांमधील दळणवळणातील व्यत्यय आणि भौगोलिक परिस्थितीमुळे बेपत्ता व्यक्तींची संपूर्ण माहिती गोळा करणे कठीण होत आहे.

सरकारी आणि सुरक्षा यंत्रणा बाधित भागांमध्ये शोध आणि बचाव कार्य करत आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, बाधित भागांमध्ये पोहोचण्याचा मार्ग पुन्हा मोकळा करणे आणि पुरामुळे अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande