अमेरिकेत इंग्रजी भाषेच्या अटीवर 28 हजारांहून अधिक स्थलांतरित ट्रकचालकांचे परवाने रद्द
वॉशिंग्टन , 05 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेत 28 हजारांहून अधिक स्थलांतरित ट्रकचालकांचे व्यावसायिक वाहनचालक परवाने रद्द करण्यात आले आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ट्रम्प प्रशासनाने या व
अमेरिकेत इंग्रजी भाषेच्या अटीवर 28 हजारांहून अधिक स्थलांतरित ट्रकचालकांचे परवाने रद्द


वॉशिंग्टन , 05 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेत 28 हजारांहून अधिक स्थलांतरित ट्रकचालकांचे व्यावसायिक वाहनचालक परवाने रद्द करण्यात आले आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ट्रम्प प्रशासनाने या व्यावसायिक ट्रकचालकांचे परवाने निलंबित केले असून, त्यांच्या जागी लष्करातील माजी सैनिकांना संधी देण्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू केला आहे.

ट्रम्प प्रशासनाने राज्य सरकारांच्या सहकार्याने 9,500 ड्रायव्हिंग स्कूल बंद केल्याचीही माहिती दिली आहे. या प्रशिक्षण संस्थांवर अपात्र ट्रकचालकांना अमेरिकेत वाहन चालविण्यास मदत केल्याचा आरोप आहे. ऑगस्ट 2025 मध्ये फ्लोरिडामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर स्थलांतरित ट्रकचालकांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. या अपघातात एका ट्रकचालकाने बेकायदेशीरपणे यू-टर्न घेतल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नसलेल्या 26 हजार ट्रकचालकांना रस्त्यावरून हटविण्यात आले आहे. अमेरिकेच्या परिवहन विभागाने ट्रकचालकांसाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान अनिवार्य करणाऱ्या नियमाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.

अमेरिकेचे परिवहन मंत्री शॉन डफी यांनी सांगितले की, फ्लोरिडा अपघातासाठी जबाबदार असलेल्या भारतीय ट्रकचालकाला सुरुवातीलाच वाहनचालक परवाना देण्यात येऊ नये होता. प्रेस निवेदनानुसार, सुमारे 24 हजार गैर-नागरिकांचे व्यावसायिक वाहनचालक परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामागील कारण म्हणजे त्यांना इंग्रजी भाषा व्यवस्थित बोलता किंवा वाचता येत नव्हती.

एका अहवालानुसार, अमेरिकेत सुमारे 1.3 लाख ते 1.5 लाख ट्रकचालक पंजाब आणि हरियाणा येथून आले आहेत. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम या समुदायावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने माजी सैनिकांसाठी नवे अभियान सुरू केले आहे. अलीकडेच लष्करात मोठी वाहने चालविलेल्या माजी सैनिकांना कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स (CDL) मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य चाचणीत (स्किल टेस्ट) सवलत देण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या परिवहन विभागाने सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश अमेरिकेतील रस्ते अधिक सुरक्षित करणे, धोकादायक परदेशी चालकांविरोधात कठोर कारवाई करणे आणि अमेरिकन ट्रकचालकांना अधिक संधी उपलब्ध करून देणे हा आहे.या प्रकरणावर भाष्य करताना परिवहन मंत्री शॉन डफी म्हणाले, “जे बेकायदेशीर स्थलांतरित आमची भाषा बोलू शकत नाहीत, त्यांना मोठे ट्रक चालवण्याचा कोणताही अधिकार नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande