सेलूतील र सिमेंट रस्त्याविरोधात रिपब्लिकन युवा सेनेचे जोरदार आंदोलन
परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सेलू येथील गट क्रमांक 60 मधील कथित बेकायदेशीर सिमेंट रस्ता तात्काळ पाडण्यात यावा, संबंधित तत्कालीन उपकार्यकारी अभियंत्याला निलंबित करून पीडित जयस्वाल कुटुंबाला न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन यु
सेलूतील र सिमेंट रस्त्याविरोधात रिपब्लिकन युवा सेनेचे जोरदार आंदोलन


परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सेलू येथील गट क्रमांक 60 मधील कथित बेकायदेशीर सिमेंट रस्ता तात्काळ पाडण्यात यावा, संबंधित तत्कालीन उपकार्यकारी अभियंत्याला निलंबित करून पीडित जयस्वाल कुटुंबाला न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी खोर, टोपली, टिकाव आणि कुदळ हातात घेत ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा काढला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण आणि लक्षवेधी वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी संबंधित अधिकार्यांविरोधात घोषणाबाजी करत कथित बेकायदेशीर सिमेंट रस्त्याची तात्काळ तोडफोड करावी, दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी तसेच जयस्वाल कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी केली. यानंतर रिपब्लिकन युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना निवेदन सादर केले. मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande