कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तन्वी शर्माचा पराभव
असान (दक्षिण कोरिया), 07 ऑगस्ट (हिं.स.)। भारताची 17 वर्षीय स्टार बॅडमिंटनपटू तन्वी शर्माचा कोरिया मास्टर्स 2026 मधील शानदार प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. तिला अखिल भारतीय लढतीत रक्षिता रामराज हिने 18-21, 21-19, 21-19 अशा फरकाने पराभूत कर
Sports Badminton Korea Masters Tanvi


असान (दक्षिण कोरिया), 07 ऑगस्ट (हिं.स.)। भारताची 17 वर्षीय स्टार बॅडमिंटनपटू तन्वी शर्माचा कोरिया मास्टर्स 2026 मधील शानदार प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. तिला अखिल भारतीय लढतीत रक्षिता रामराज हिने 18-21, 21-19, 21-19 अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

गेल्या आठवड्यात तायपेई ओपन सुपर-300 चे विजेतेपद पटकावून सर्वात कमी वयाची विजेती ठरलेली तन्वीने पहिला गेम जिंकत शानदार सुरुवात केली होती. मात्र, रक्षिताने दमदार पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा गेम जिंकला. या विजयासह रक्षिताने तन्वीविरुद्धचा आपला हेड-टू-हेड विक्रम 4-0 असा केला.

पराभवानंतरही तन्वीने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. तिने या स्पर्धेत अनेक उच्च मानांकित खेळाडूंना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, त्यामुळे या महिन्यात होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी तिचा आत्मविश्वास आणखी बळकट झाला आहे.

यापूर्वी प्री-उपांत्यपूर्व फेरीत तन्वीने अखिल भारतीय सामन्यात श्रियांशी वालिशेट्टी हिला 21-16, 17-21, 21-13 अशा फरकाने पराभूत केले होते.

आता उपांत्य फेरीत रक्षिताचा सामना भारताच्या अश्मिता चालिहाशी होणार आहे. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिला 20-22, 21-15, 21-19 अशा फरकाने पराभूत करत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.

पुरुष दुहेरीत भारताच्या पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्ण प्रसाद गरागा यांनी दक्षिण कोरियाच्या किम यंग-ह्युक आणि शिन ताए-यांग यांचा 21-18, 21-19 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

तर महिला दुहेरीत सोनाली सिंह आणि रितिका ठाकेर यांचा जपानच्या सातव्या मानांकित सुमिरे नाकादे आणि मियू ताकाहाशी या जोडीकडून 21-15, 21-9 असा पराभव झाला. मिश्र दुहेरीत सहाव्या मानांकित भारतीय जोडी ईशान भटनागर आणि श्रुती मिश्रा यांना दक्षिण कोरियाच्या शिन ताए-यांग आणि किम यू जंग यांच्याविरुद्ध 21-16, 16-21, 21-13 असा पराभव स्वीकारावा लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande