
मुंबई, 10 सप्टेंबर (हिं.स.) : L’Oréal Paris ने भारतातील सणासुदीसाठी आपल्या Casting Crème Gloss हेअर कलरचे एक खास लिमिटेड-एडिशन कलेक्शन लाँच केले आहे. या कलेक्शनमधील 'स्पाईस्ड सिनेमन ब्राऊन' या शेडच्या पॅकवर मराठी अभिनेत्री सई गोडबोले मुख्य चेहरा म्हणून गाजली आहे. सई तिच्या व्हायरल म्युझिक कव्हर्स आणि मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रील्स व व्हिडिओजमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय आहे. भारतीय सणांमधील उत्साह आणि आजच्या पिढीची आधुनिक जीवनशैली यांचा सुरेख संगम सईच्या व्यक्तिमत्त्वातून सहज दिसून येतो, हाच बाज या नव्या शेडमधून मांडण्यात आला आहे.
एखाद्या जागतिक ब्युटी ब्रँडने केवळ भारतासाठी अशी विशेष फेस्टिव हेअर कलर रेंज आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कलेक्शनमधील हेअर कलर शेड्स, त्यांची नावे आणि पॅकेटवर दिसणारे चेहरे—हे सर्व काही पूर्णपणे भारतीय संस्कृती आणि परंपरांशी जोडलेले आहे.
या कलेक्शनमध्ये तीन नवीन ब्राऊन शेड्स सादर करण्यात आल्या आहेत: पहिला 'फिल्टर कापी ब्राऊन', जो दाक्षिणात्य फिल्टर कॉफीच्या गडद रंगापासून प्रेरित आहे; दुसरा 'चाय लाते ब्राऊन', जो भारतीय चहाच्या उत्कृष्ट स्वादावर आधारित आहे; आणि तिसरा 'स्पाईस्ड सिनेमन ब्राऊन', जो दालचिनीचा वॉर्म गोल्डन टोन्स रंग दर्शवतो. भारतीय लूक अधिक आकर्षित बनवण्यासाठी हा प्रत्येक शेड केसांना चमकदार रंग देतो आणि खास भारतीय परंपरेची ओळख करून देतो.
या कलेक्शनच्या माध्यमातून L’Oréal Paris आपले जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणून देशभरातील ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करवून देत आहे. यासोबतच, आजच्या बदलत्या भारतात सौंदर्याची नवी व्याख्या लिहिणाऱ्या स्थानिक लोकसंस्कृतीला आणि व्यक्तींना हा ब्रँड एक विशेष ओळख देत आहे.
सणासुदीच्या खास लुकसाठी तयार करण्यात आलेल्या या लिमिटेड-एडिशन रेंजमध्ये Casting Crème Gloss तोच खात्रीशीर फॉर्म्युला आहे. हा अमोनिया-मुक्त हेअर कलर L’Oréal Paris च्या Glycolic Gloss Complex ने समृद्ध आहे, ज्यामुळे केसांना ५ पटीपर्यंत अधिक चमक मिळते आणि ते निरोगी दिसतात. यामुळे ग्राहकांना घरीच सलूनसारखा हेअर कलरिंगचा अनुभव मिळतो.
हे अनोखे लाँच ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि भारतीय संस्कृतीला साजेसा सौंदर्याचा अनुभव देण्याच्या L’Oréal च्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर