परभणीत अवैध वाळू वाहतुकीवर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 13 कारवाया
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध परभणी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 13 कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये तब्बल 67 लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्य
परभणीत अवैध वाळू वाहतुकीवर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 13 कारवाया


परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध परभणी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 13 कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये तब्बल 67 लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 16 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या मोहिमेंतर्गत सात कारवाया केल्या. त्यामध्ये हायवा व टिप्परसह आठ वाहने जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 41 लाख 92 हजार रुपये आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनीही अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात सहा कारवाया केल्या. या कारवायांमध्ये सहा वाहने आणि 25 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशाप्रकारे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या 13 कारवायांमध्ये एकूण 67 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळू चोरी व वाहतूकप्रकरणी 16 आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अवैध वाळूचा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांना अवैध वाळू उपसा किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande