भाजपच्या ओबीसी मोर्चाला नवे बळ; प्रकाश घोगरे रायगड जिल्हा उपाध्यक्ष
रायगड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी खालापूर तालुक्यातील हातनोलि गावचे प्रकाश घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस
New-boost-for-BJPs-OBC-Morcha


रायगड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी खालापूर तालुक्यातील हातनोलि गावचे प्रकाश घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.

नियुक्तीचे पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात ओबीसी समाजाला संघटित करून भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रकाश घोगरे योगदान देतील, अशी अपेक्षा रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजेश भगत यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना नवनियुक्त उपाध्यक्ष प्रकाश घोगरे म्हणाले की, पक्षाच्या आदेशानुसार उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, मोतीराम ठोंबरे आणि मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली तळागाळात जाऊन संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सरपंच रीतू ठोंबरे, प्रदीप गोंधळी, गुड्या देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रकाश घोगरे यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande