
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
कृष्णूर येथून जवळच
असलेल्या महिनाभर भाविकांनी तीर्थक्षेत्र गंगनबीड येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. नायगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत नगरसेवक, व्यापारी व कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत मंदिर परिसरात स्वच्छता केली आणि संपूर्ण परिसर पाण्याने धुवून स्वच्छ केला.
यावेळी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, नगराध्यक्षा प्रतिनिधी संजय चव्हाण, पांडुरंग चव्हाण, विराज चव्हाण, माणिक चव्हाण, विठ्ठल बेळगे, साईनाथ
मेडेवार, पवन गादेवार, सुरेश चव्हाण, अरविंद चव्हाण, बालाजी शिंदे यांच्यासह माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी, काँग्रेसचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
विजय पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाचे ग्रामीण भागातील ग्रामस्थांसह देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis