
कोल्हापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 गावे आणि चार वाड्या येथील गेल्या एक वर्षात विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने हद्दपार केलेल्या गुंडांच्या टोळीतील आरोपींवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. हद्दपार असलेल्या गुंडांचा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावर दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन स. पो. नि. सुनील गायकवाड यांनी नागरिकांना केले आहे.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हददीतील विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी व.व. २८ रा विलास नगर शिरोली (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदार अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी व.व. २४ रा विलास नगर शिरोली, आशिष लक्ष्मण वाडकर व.व. २८ रा. नागांव, श्रीकांत महादेव कोळी व.व. २७ रा. माळवाडी, शिरोली, राहूल ऊर्फ आकाश ईश्वर आयवळे व.व.२९ त्यांचेवर कारवाई करुन कोल्हापूर व सांगली जिल्हयातून एक वर्ष हददपार करण्यात आलेले आहे. तसेच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हददीतील अविनाश अनिल कोळी, वय ३५ वर्ष, रा. शिरोली, (टोळी प्रमुख) व त्याचा साथीदार श्रीकांत तानाजी मोहिते, वय ३४ वर्ष, रा. समता परिसर, शिरोली पुलाची, कार्तिक परशुराम राजुगरीकर, वय ३१ वर्ष, रा. विलासनगर, माळवाडी, अनिकेत आनंदा कांबळे रा. शिरोली पुलाची, ऋषिकेश उर्फ प्रताप शिवाजी भोरे रा. शिरोली पुलाची हे वडगांव पोलीस ठाणे जि. कोल्हापूर यांचेवर कारवाई करुन कोल्हापूर जिल्हयातून एक वर्ष हददपार करण्यात आलेले आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ चे अनुषंगाने शिरोली पोलीस ठाणे हददीतील गणेश जनार्दन जठार, संगाम प्रकाश जाधव, युवराज शिवाजी जाधव, नंदुकुमार वसंत खाडे रा. जठारवाडी, स्नेहंकित नंदकुमार खाडे, दिग्वीजय नंदकुमार खाडे सर्व रा. जठारवाडी, ता. करवीर यांना दि. १२/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ रोजी पर्यंत करवीर तालका हददीतून व कोल्हापूर शहर हददीतून हददपार करण्यात आलेले आहे. तसेच सार्वजनिक गणेशत्सोव २०२६ चे अनुषंगाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हददीतील विकी आप्पासो सनदे रा. समता परिसर शिरोली पुलाची, विशाल विठ्ठल कांबळे रा. माळवाडी शिरोली पुलाची, रा. विकास शिवाजी धनवडे, रा. माळवाडी शिरोली पुलाची, त्रऋषिकेश बजरंग पवार रा. शिरोली पुलाची, ऋत्वीक बजरंग पवार रा. शिरोली पुलाची, पृथ्वीराज गजानन यादव रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक शिरोली पुलाची, आदिनाथ बाळासो यादव रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक शिरोली पुलाची.
अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे असून यापैकी कोणी शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसल्यास त्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar