समान काम, समान वेतनासाठी नांदेड जिल्हा परिषद वाहनचालकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)। उच्च न्यायालयातील वाहनचालकांप्रमाणे जिल्हा परिषद तसेच शासकीय, निमशासकीय व महानगरपालिका वाहनचालकांनाही समान काम, समान वेतन लागू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या
समान काम, समान वेतनासाठी नांदेड जिल्हा परिषद वाहनचालकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)। उच्च न्यायालयातील वाहनचालकांप्रमाणे जिल्हा परिषद तसेच शासकीय, निमशासकीय व महानगरपालिका वाहनचालकांनाही समान काम, समान वेतन लागू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे याबाबत निवेदन सादर करण्यात आले. वाहनचालकांच्या विविध संघटनांनी एकत्रितपणे ही मागणी मांडली असून, आपल्या मागणीचे निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचे संघटनांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजय राऊत, कोषाध्यक्ष शेख अहेमद, शासकीय महसूल वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर वाठोरे, महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेचे सतीश चिंतल यांच्यासह वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande