'गोकुळ'चे संस्थापक चेअरमन स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादन
कोल्हापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात आजपासून होत आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकांनी चुये ता. करवीर येथे जाऊन गोकुळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव
गोकुळ दूध संघाचे माजी संचालक


कोल्हापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात आजपासून होत आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकांनी चुये ता. करवीर येथे जाऊन गोकुळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या समाधीला मनोभावे अभिवादन केले. समाधीला पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार राजेश पाटील, विश्वासराव पाटील- आबाजी, अरुणराव डोंगळे, नविद मुश्रीफ, अजित नरके, युवराज पाटील -बापू, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगुले, डॉ. सुजित मेणचेकर, करणसिंह गायकवाड, एस.आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, अशोक फराकटे आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande