
अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)
अचलपूरला जाताना काळाचा घालादोघांचाही जागेवरच दुर्देवी मृत्यू
गणेशोत्सवादरम्यान बॅजो वाजवण्याचे कम पूर्ण करुन अचलपूरला परत जात असताना मामा-भाच्याचा सोमवारी रात्री भीषण रिंग रोडदरम्यान भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.सोमवारी १४ सप्टेंबरच्या रात्री उशिरा ही दुर्घटनाघडली. अंबापार्कजव भरधाव ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला चिरडले. या अपघातात मोटरसायकलवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतकांची ओळख विक्की शंकरराव अंभोरे (25, अचलपुर) आणि त्यांचे भाचे अभय विलास साबडे (18, अचलपुर) अशी झाली आहे. दोघेही सोमवारी अमरावतीच्या नांदगाव पेठ पसिरात एका सार्वजनिक गणेश मंडळात बँजो वाजवण्यासाठी आले होते. गणेश मंडळातील कार्यक्रम आटोपून आपल्या बेंजो वाहनात अन्य कर्मचारी आणि अन्य साहित्य ठेवून ते अचलपूर रवाना झाले. विक्की अंभोरे आणि अभय साबडे मोटरसायकलवरुन बँजो वाहनासह जात होते. यादरम्यान रिंग रोड स्थित अंबा पार्कजवळ ट्रक क्रमांक जीजे-03-बीवी-788 ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक मारली.हा अपघात एवढा भीषण होता की मामा भाचे मोटरसायकलसह ट्रकच्या चाकाखालीदबले. दोघेही चिरडले गेल्याने घटनास्थळीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
घटनास्थळी एकच गोंधळ
घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसही तातडीने तेथे पोहचले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ट्रकखालून बाहेर काढले आणि पोस्टमार्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. पोलिसांनी ट्रकचालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले. प्राप्त माहितीनुसार दोघेही दारुच्या नशेत होते. पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहे.
सामान्य रुग्णायात नातेवाईकांची गर्दी
अपघाताची माहिती मिळताच, अचलपूर येथून मृतकांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सामान्य रुग्णालयात पोहचले. रात्री उशिरा परिसरात त्यांची गर्दी झाली. या अपघातामुळे परिवारावर शोककळा पसरली. ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी