लातूरचे संस्थाचालक संजीव सोनवणे यांची राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या
लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर शहरातील प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस
आत्महत्या


लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

लातूर शहरातील प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.

संजीव सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आत्महत्येचे कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

संजीव सोनवणे हे शैक्षणिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. ते डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय आणि बालाघाट पब्लिक स्कूलचे संस्थापक होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. घटनेबाबतची संपूर्ण माहिती पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande