मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, परवानगी नसली तरी ठाम
छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथून मंगळवारी साडे अकराच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते‌. त्यांच्या उपोषणाचा आज १८
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथून मंगळवारी साडे अकराच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते‌. त्यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस होता. मागील काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस तोडगा काढलेला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा करत मराठा समाजाला मोठ्या संख्येनी मुंबईला येण्याचं आवाहन आधी केलं होतं. मात्र, आता मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना आणखी एक मोठी घोषणा केली आहे. “सगळे नाही, तर मी एकटाच मुंबईला येतोय, आता सरकार कशी परवानगी देत नाहीत तेच बघतो”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. त्या दृष्टीने मंगळवारी मुंबईकडे ते निघाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande