
जालना, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतूक तसेच अवैध दारूविक्रीविरोधात महसूल, प्रादेशिक परिवहन विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अवैध गौण खनिज वाहतूक करणारा एक हायवा वाहन जप्त करण्यात आला असून, आरटीओ विभागाने विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत दंड वसूल केला. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करून एक गुन्हा दाखल केला आहे.
महसूल विभागाच्या पथकाने जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद गटट् फॅक्टरी येथे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर कारवाई केली. या वाहनातून गौण खनिजाची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यानंतर वाहन जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बदनापूर परिसर आणि अंबड-सोलापूर-धुळे मार्गावर वाहनांची तपासणी केली. या तपासणीत एकूण 40 वाहनांची तपासणी करून 14 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ओव्हरलोड वाहने, फिटनेस प्रमाणपत्रासंबंधी त्रुटी, विमा प्रमाणपत्र नसणे तसेच रिफ्लेक्टर नसणे अशा विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघनांची प्रकरणे आढळली. या कारवाईत जागेवर 10 हजार 500 रुपयेत तर ई-चलानाद्वारे 53 हजार 500 रुपये असा एकुण 64 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत कदीम जालना पोलीस ठाणे हद्दीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता नुसार कलम 126 अन्वये अन्वये एका इसमावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिस दलाकडूनही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे जालना जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis