मुराद खेतानी विजय सेतुपतीच्या 'बाथ्था' चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण
मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ''कबीर सिंग'' आणि ''भूल भुलैया २'' यांसारख्या चर्चित चित्रपटांचे निर्माते मुराद खेतानी आता आपल्या कंपनी सिने१ स्टुडिओजच्या माध्यमातून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहेत. सिने१ स्टुडिओजने राष्ट्रीय पुरस्क
MURAD KHETANI ENTER SOUTH CINEMA BATHTHA


मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.)। 'कबीर सिंग' आणि 'भूल भुलैया २' यांसारख्या चर्चित चित्रपटांचे निर्माते मुराद खेतानी आता आपल्या कंपनी सिने१ स्टुडिओजच्या माध्यमातून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहेत. सिने१ स्टुडिओजने राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते विजय सेतुपतीच्या प्रमुख भूमिकेतील तमिळ चित्रपट 'बाथ्था'साठी ए फॉर ॲपल स्टुडिओजसोबत भागीदारी केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन बालाजी थरनीधरन यांनी केले आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, हा चित्रपट १ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'बाथ्था'च्या माध्यमातून सिने१ स्टुडिओज हिंदी चित्रपटसृष्टीच्या पुढे जात विविध भाषांमधील कथा मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने पुढे जात आहे. चित्रपटात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असून संगीत साई अभ्यंकर यांनी दिले आहे. चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील स्थानिक पार्श्वभूमी आणि मजबूत मुळांशी जोडलेल्या कथांमध्ये देशभरातील प्रेक्षकांशी जोडले जाण्याची क्षमता आहे. कंपनीचे उद्दिष्ट केवळ नव्या बाजारपेठेत प्रवेश करणे नसून, विविध भाषांमधील चित्रपट निर्माते आणि प्रतिभावंतांसोबत दीर्घकाळ सर्जनशील भागीदारी करणे हे आहे.

स्टार स्टुडिओ१८ आणि ॲटली यांनी सादर केलेल्या या चित्रपटाची निर्मिती ए फॉर ॲपल स्टुडिओज आणि सिने१ स्टुडिओज यांनी संयुक्तपणे केली आहे. चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी, प्रिया ॲटली, आलोक जैन आणि अजित अंधारे आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझरमध्ये चित्रपटाची कथा आणि त्याच्या विश्वाची पहिली झलक पाहायला मिळते. विजय सेतुपती आणि बालाजी थरनीधरन यांसारख्या नावांसोबत सिने१ स्टुडिओजची ही भागीदारी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील कंपनीच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande