मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा
बीड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गात मोठा अडथळा आला आहे. उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मनोज जरांगे पाटील बुधवारी सकाळी 11 वाजता पाटोद्याहून
अ


बीड, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गात मोठा अडथळा आला आहे. उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मनोज जरांगे पाटील बुधवारी सकाळी 11 वाजता पाटोद्याहून पुढच्या मुक्कामाला म्हणजे श्रीगोंद्याला रवाना होणार होते. मात्र, आज सकाळपासून मनोज जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील अजूनही झोपून आहेत. त्यांना जागेवरुन हलणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील पुढच्या मुक्कामला निघणार की बीडच्या पाटोद्यातच आराम करणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान पाटोद्यात डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली. जरांगे यांनी उपचार न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे डॉक्टरांनी म्हटले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande