रितसर नोंदणी दस्तऐवजांद्वारे खरेदी केलेल्या जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी धमकावणाऱ्यांवर कारवाई करा : विजय मस्के
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। आपण कायदेशीर मार्गाने रितसर दस्तऐवजांद्वारे खरेदी केलेल्या मौजे वरवंटी येथील गट क्रमांक ८५ मधील जमिनीवर अनधिकृतपणे ताबा मिळविण्यासाठी आपल्याला धमकावणाऱ्यांवर मंडळींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजय अशोकराव म
मागणी


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

आपण कायदेशीर मार्गाने रितसर दस्तऐवजांद्वारे खरेदी केलेल्या मौजे वरवंटी येथील गट क्रमांक ८५ मधील जमिनीवर अनधिकृतपणे

ताबा मिळविण्यासाठी आपल्याला धमकावणाऱ्यांवर मंडळींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजय अशोकराव मस्के यांनी शुक्रवारी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सदरील जमिनीच्या नोंदणीकृत दस्तऐवजांच्या सत्यप्रतीही प्रसार माध्यमांपुढे सादर करून या प्रकरणी योग्य त्या न्याय निवाड्याची अपेक्षा व्यक्त केली.

लातूरमध्ये प्लॉट, जमिनीवर अनधिकृतरित्या ताबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगून लातूर येथील राजा मणियार आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी माध्यमांसमोर केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande