
बीड, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। शिक्षण, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कै. रामभाऊ (आण्णा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप शिवाजीराव खाडे यांच्या कार्याचा मॉरिशसच्या भूमीत जागतिक गौरव झाला आहे. याबद्दल राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात जल्लोषात सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक कार्यासोबतच प्रदीप खाडे यांचा धार्मिक आणि सामाजिक कार्यातही सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्याची धडपड, सामाजिक कार्यासाठी असलेली तळमळ, धार्मिक परंपरा आणि संस्कृतीशी असलेली नाळ आणि समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्याची सेवाभावी वृत्ती यामुळे प्रदीप खाडे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुरू झालेल्या कार्याचा गौरव मॉरिशसच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झाला आहे. त्याबद्दल राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात जल्लोषात सत्कार करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करत मित्रपरिवाराकडून हृदय सत्कार करण्यात आला.यावेळी लक्ष्मण अण्णा भोईटे, सतीश भोईटे, दिनेश हजारे ,परमेश्वर रेवले,गजानन गीते ,सतीश शिंदे ,वेदांत सारडा, योगेश नानवटे, प्रशांत आप्पा थोनटे, प्रा. प्रवीण फुटके,प्रा. रविंद्र जोशी, प्रा.अतुल दुबे,मोहन व्हावळे, धीरज जंगले, महादेव गित्ते, अनिल गायकवाड, अनंत कुलकर्णी, मोहन साखरे, वैजनाथ कळसकरआदींसह मित्र मंडळ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis