
नाशिक, 02 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठा समाजाच्या प्रश्नांकडे
मराठा आरक्षण उपसमिती गठीत होऊन अनेक दिवस उलटले असतानाही मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी केला आहे.
मराठा समाजाला मिळालेले स्वतंत्र १० टक्के आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत असताना सरकारकडून त्याची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याची माहिती समाजाला देणे ही आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र याबाबत विखे पाटील कोणतीही ठोस भूमिका मांडताना दिसत नसल्याने मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे, असे गायकर यांनी म्हटले. आरक्षण उपसमितीकडूनच दुर्लक्ष होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI