
नवी दिल्ली , 20 सप्टेंबर (हिं.स.)।काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिवे लावण्याच्या अभियानावर त्यांनी टोला लगावला. राहुल गांधी यांनी रविवारी (२० सप्टेंबर) म्हटले की, सरकारकडे दिवे लावण्यासाठी पैसे आहेत; मात्र विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे उभारण्यासाठी पैसे नाहीत.
राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी एका विद्यार्थिनीने त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या होत्या. ती म्हणाली, “दर महिन्याला घरभाड्याची चिंता आणि बेघर होण्याची भीती यामध्येच अभ्यास करावा लागतो.अनेक मुली केवळ राहण्यासाठी जागा नसल्यामुळे शिक्षण सोडून देतात. आणि निवास भत्ता? तो महागाईनुसार वाढत नाही आणि त्यातही भ्रष्टाचार होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्या मुलीच्या प्रश्नाचे तुमच्याकडे काही उत्तर आहे का?”
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “विद्यार्थिनींना केवळ सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. दर महिन्याला घरभाड्याची चिंता आणि बेघर होण्याची भीती यामध्येच त्यांना अभ्यास करावा लागतो. अनेक मुली केवळ राहण्यासाठी जागा नसल्यामुळे शिक्षण सोडून देतात. निवास भत्ता महागाईनुसार वाढत नाही आणि त्यातही भ्रष्टाचार होतो.”
राहुल गांधी म्हणाले, “ही व्यवस्था नेमकी काय आहे? विद्यार्थी म्हणजे काय आणि ही व्यवस्था त्याला कशाप्रकारे दडपते? विद्यार्थ्यांच्या भविष्यापुढे ही व्यवस्था आव्हान उभी करत आहे. तरुण हे देशाचे भविष्य आहेत आणि तरुणांशिवाय कोणताही देश मजबूत होऊ शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये अनेक वेगवेगळे गुण असतात. विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता. विद्यार्थी स्वाभाविकपणे प्रश्न विचारतात आणि जिज्ञासू असतात. ते विविध विषयांवर प्रश्न विचारतात. विद्यार्थी प्रेमाला महत्त्व देणारे असतात; ते द्वेष करत नाहीत. ते एकमेकांशी प्रेमाने वागतात आणि एकमेकांचा आदर करतात. त्यांच्यामध्ये मानवतेची भावना असते.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode