आशियाई क्रीडा स्पर्धा: भारतीय महिला कबड्डी संघाचा इराणवर ३७-२३ ने विजय
नागोया (जपान), 23 सप्टेंबर (हिं.स.)आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने आपली विजयी घौडदौड कायम राखत, गट-फेरीतील सामन्यात इराणचा ३७-२३ ने पराभव केला. भारताची सुरुवात संथ झाली आणि पहिल्या सत्रात संघ इराणपेक्षा ९-११
भारतीय महिला कबड्डी संघ


नागोया (जपान), 23 सप्टेंबर (हिं.स.)आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने आपली विजयी घौडदौड कायम राखत, गट-फेरीतील सामन्यात इराणचा ३७-२३ ने पराभव केला.

भारताची सुरुवात संथ झाली आणि पहिल्या सत्रात संघ इराणपेक्षा ९-११ अशा गुणांनी पिछाडीवर होता; मात्र त्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. भारतीय संघाने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत पहिल्या सत्राच्या अखेरीस १९-१५ अशी आघाडी घेतली. भावना देवीने महत्त्वपूर्ण 'टॅकल्स' करत महत्त्वाची भूमिका बजावली, तर पूजाने मोक्याच्या क्षणी गुण मिळवून भारताला सामन्यावरील पकड कायम राखण्यास मदत केली.

दुसऱ्या सत्रात भारताने आपली आघाडी अधिक वाढवली आणि इराणवर ३७-२३ असा सहज विजय मिळवला. महिलांच्या कबड्डी स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. याआधी, भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा ४२-२१ असा पराभव केला होता. आता भारतीय महिला संघ जपानविरुद्ध खेळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande