नंदुरबार - घरफोडीच्या गुन्ह्याची उकल; 1 लाख 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
नंदुरबार, 24 सप्टेंबर, (हिं.स.) - जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेवून मालमत्तेविरुध्द्धे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवून असे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे, तसेच आरोपींना जेरबंद करुन मालमत्तेविर
नंदुरबार - घरफोडीच्या गुन्ह्याची उकल; 1 लाख 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत


नंदुरबार, 24 सप्टेंबर, (हिं.स.) - जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेवून मालमत्तेविरुध्द्धे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवून असे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे, तसेच आरोपींना जेरबंद करुन मालमत्तेविरुद्ध्या घटनांना प्रतिबंध करणे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने तळोदा पोलीस ठाणे अभिलेखावरील ना उघड गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 3 ते 4 दिवसापूर्वी तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील आंबागव्हाण फाट्यावर झ गालेली चोरी ही तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील रोझवा पुनर्वसन राहणारे रायमल वसावे व विरसा वसावे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केलेली आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदरची माहिती पथकाला कळवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील रोझवा पुनर्वसन गावात जावून माहिती घेवून संशयीत 3 मुलांना ताब्यात घेवून 1) विरसिंग रमेश वसावे वय-22 रा. रोझवा पुनर्वसन नंबर 4 ता.तळोदा जि. नंदुरबार 2) भुषण मोज्या पावरा वय-23 रा. रोझवा पुनर्वसन नंबर 4 ता. तळोदा जि. नंदुरबार 3) किसन कोंदा पावरा वय-55 रा. रोझवा पुनर्वसन नंबर 3 ता. तळोदा जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरची चोरी ही त्यांचा 2 साथीदाराच्या मदतीने केली असलेबाबत सविस्तर माहिती दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून 92,000/- रुपये किमतीचे 460 ग्रॅम चांदीचे व 87,878/- रुपये किमतीचे 7.900 ग्रॅम सोन्याचे दागिने व 10 हजार रुपये रोख असा एकूण 1,89,878/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधिक्षक अशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक महेश निकम, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार राहुल पांढारकर, विशाल मराठे, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande