
छत्रपती संभाजीनगर, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेश विसर्जन पूर्वतयारीचा आढावा: मोतीबाग विसर्जन कुंड येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी!
उद्या दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, आज मोतीबाग येथील विसर्जन कुंडाची संयुक्त पाहणी करण्यात आली.
या पाहणी दरम्यान जालना शहराच्या मा. आयुक्त अंजली शर्मा (IAS), जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , पोलीस प्रशासन तसेच सर्व संबंधित विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान दिलेले प्रमुख निर्देश व आढावा:
१. सुरक्षा व सुव्यवस्था:विसर्जन स्थळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त व अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश.
२. नागरी सुविधा:पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था (लाइटिंग), आणि स्वच्छता विभागाला सतत कार्यरत राहण्याच्या सूचना.
३. पर्यावरणपूरक विसर्जन:विसर्जन कुंड आणि निर्माल्य संकलन केंद्रांची पाहणी करून योग्य नियोजनाबाबत सर्व विभागप्रमुखांना आवश्यक त्या प्रशासकीय सूचना देण्यात आल्या.
नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis