अनमोल इंडस्ट्रीजने आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी केला दाखल
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.)। कोलकाता येथील बिस्किट आणि बेकरी ब्रँड अनमोल इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) ड्राफ्ट रेड
આગામી સપ્તાહે પાંચ નવા IPO સબ્સ્ક્રિપ્શન માટે ખુલશે,પાંચ કંપનીઓ લિસ્ટેડ થશે


नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.)। कोलकाता येथील बिस्किट आणि बेकरी ब्रँड अनमोल इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.

भांडवली बाजार नियामक सेबीकडे जमा केलेल्या मसुदा दस्तऐवजानुसार, कोलकाता येथील बिस्किट आणि बेकरी ब्रँड अनमोल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ५ रुपये दर्शनी मूल्याच्या या आयपीओमध्ये कोणतेही नवीन समभाग (फ्रेश इश्यू) जारी केले जाणार नाहीत. अनमोल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या माहितीनुसार, हा संपूर्ण इश्यू ऑफर फॉर सेल (ओएफएस)वर आधारित असेल.

कंपनीची या आयपीओद्वारे १,८०० कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. कंपनीमध्ये सुमारे ८४ टक्के हिस्सेदारी असलेला बैजनाथ चौधरी अँड फॅमिली ट्रस्ट हा यातील एकमेव समभाग विक्रीधारक आहे. प्रवर्तक बैजनाथ चौधरी आणि फॅमिली ट्रस्टकडून १,८०० कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांची विक्री (ऑफर-फॉर-सेल) केली जाणार आहे. यातून कंपनीला कोणताही नवीन निधी मिळणार नाही.

उल्लेखनीय म्हणजे, २००९ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी भारतातील ब्रँडेड पॅकेज्ड फूड्स कंपनी आहे. कंपनीचा भर महत्त्वाकांक्षी आणि प्रीमियम उत्पादनांवर आहे. बिस्किट आणि कुकीज श्रेणीत कंपनीची मजबूत उपस्थिती असून, केक, बेकरी उत्पादने, चॉकलेट-कोटेड वेफर्स आणि भारतीय मिठाईच्या क्षेत्रातही कंपनीची उपस्थिती वाढत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande