रत्नागिरी : निरूळच्या जंगलात अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह
रत्नागिरी, 26 सप्टेंबर (हिं.स.) । निरूळ (ता. रत्नागिरी) येथील दोणी परिसरातील जंगलात सुमारे ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. काल, दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार स्थानिक
रत्नागिरी : निरूळच्या जंगलात अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह


रत्नागिरी, 26 सप्टेंबर (हिं.स.) । निरूळ (ता. रत्नागिरी) येथील दोणी परिसरातील जंगलात सुमारे ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. काल, दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

मिळालेल्या माहितीनुसार, निरूळ-दोणी येथील घनदाट झाडाझुडपांमध्ये असलेल्या एका आष्ट्याच्या झाडाच्या आडव्या फांदीला नायलॉन दोरीला या अनोळखी तरुणाचा मृतदेह लटकताना आढळला. घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला असून त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande