पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री; १२ हजारांची क्रीम जप्त
पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। भारतात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद केलेल्या ‘गोरी ब्यूटी क्रीम’ची पिंपरीतील दुकानातून विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) पिंपरीतील रिव
grdf


पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। भारतात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद केलेल्या ‘गोरी ब्यूटी क्रीम’ची पिंपरीतील दुकानातून विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) पिंपरीतील रिव्हर रोड परिसरात कारवाई करून १२ हजार ६५० रुपये किमतीच्या २३ क्रीम जप्त केल्या.

या प्रकरणी विक्रेता प्रकाश मनोहरलाल गुरु (वय ३९, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) याच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘गोरी ब्यूटी क्रीम’च्या भारतातील कंपनीचे अधिकृत तपासणी अधिकारी रईसोदीन इनामदार यांनी याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एटीबीच्या पथकाने रिव्हर रोड परिसरातील संबंधित दुकानावर कारवाई केली.

कारवाईदरम्यान ‘मेड इन पाकिस्तान’ असे नमूद असलेल्या २३ क्रीम जप्त करण्यात आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande