मावसाळा येथे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन सध्याच्या पिकांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी मावसाळा येथे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन सध्याच्या पिकांची पाहणी केली. यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा शेतीवर मोठा परिणाम
अ


छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)

छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी

मावसाळा येथे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन सध्याच्या पिकांची पाहणी केली. यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा शेतीवर मोठा परिणाम झाला असून, पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने अनेक पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिकांची अवस्था अत्यंत चिंताजनक असून, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

पाहणीदरम्यान विविध शेतांमध्ये जाऊन पिकांची सद्यस्थिती, जमिनीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता आणि पिकांवर झालेला परिणाम याची प्रत्यक्ष माहिती घेतली. अनेक शेतकऱ्यांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाढलेला उत्पादन खर्च, घटलेले उत्पादन आणि भविष्यातील शेतीच्या नियोजनाबाबतच्या अडचणी याबाबत आपली व्यथा मांडली.

यावेळी शेतकरी बांधवांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पिकांचे नुकसान, सिंचनासाठी उपलब्ध असलेले पाणी, आवश्यक असलेली मदत तसेच शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संभाव्य उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

बळीराजाच्या कष्टाची आणि त्याच्या शेतीची परिस्थिती प्रत्यक्ष शेतावर जाऊन समजून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदावर न राहता त्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांना आवश्यक ती मदत आणि दिलासा मिळावा, यासाठी संबंधित प्रशासन व शासनाकडे पिकांच्या नुकसानीची योग्य नोंद, पंचनामे आणि आवश्यक मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande